नवी दिल्ली :  रिलायन्स जिओने लॉन्चिंगमुळे टेलिकॉम सेक्टरला हादरून टाकले. रिलायन्सची ही खास ऑफर मिळविण्यासाठी अनेकांनी दुकानाबाहेर रांग लावली. अनेकांना दिड महिना झाला तरी सिम कार्ड मिळत नाही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता कंपनीने आपल्या सीमची विक्री सामान्य दुकानात सुरू केली आहे. यामुळे सिम आता सहजासहजी उपलब्ध होत आहे. आता बाजारात दोन प्रकारचे सीम मिळत आहेत. एक निळ्या रंगाचे आणि एक नारंगी रंगाचे.  तुम्ही सिम खरेदी करताना गोंधळून जाल, पण आता तुम्हांला यातील फरक आम्ही सांगतो. 


नारंगी पॅकेटमधील सिममध्ये काय आहे खास 


जिओचे सिम ज्या नारंगी पाकीटात मिळते ते रिलायन्सने प्रिव्ह्यूच्या वेळी लॉन्च केले होते. कंपनीचे हे सिम ५ सप्टेंबरपूर्वीचे आहे त्यामुळे ते सिम तुम्ही दुसऱ्या कंपनीत पोर्ट करू शकत नाही. त्यामुळे ते फक्त रिलायन्समध्येच युज करू शकतो. हे सिम लवकर अॅक्टीवेट होते. 


ब्ल्यू सिममध्ये काय आहे खास


ऑरेंज सिम पॅकची कमतरता पूर्ण करण्यासाठी ब्ल्यू पॅक सिम आणला आहे. यात तुम्ही नंबर पोर्ट करू शकतात. ब्ल्यू पॅकेट सिम आपल्या प्री डिसाईड नंबरमध्ये येत नाही. पण यात तुम्ही तुमच्या आवडीचा क्रमांक निवडू शकत नाही. तुम्हांला तोच नंबर मिळेल जो सिस्टिम जनरेट आहे. या सिमला अॅक्टव्हेट व्हायला जास्त वेळ लागतो.