आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी गूगल आणि अॅपलला सरकारचे आदेश
आधार कार्ड देशातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योग्य माहिती जमा करण्यासाठी केंद्र सरकारने अॅप्पल आणि गूगलला तांत्रिकदृष्ट्या याचा वापर करण्यास सांगितलं आहे.
मुंबई : आधार कार्ड देशातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योग्य माहिती जमा करण्यासाठी केंद्र सरकारने अॅप्पल आणि गूगलला तांत्रिकदृष्ट्या याचा वापर करण्यास सांगितलं आहे.
सध्या करोडो भारतीय आधार कार्डाच्या माध्यमातून अनेक सरकारी आणि गैरसरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे कंपन्यांना भारतातील वाढत्या बाजारात आपली जागा बनवणे कठीण होणार आहे. अॅप्पल आणि गूगल सारख्या कंपन्या त्यांच्या फोन आणि ऑपरेटिंग सिस्टममध्ये इंडियन रजिस्ट्रेशन, एन्क्रिप्शन म्हणजे कोडिंग आणि सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या तांत्रिक गोष्टींपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी अॅप्पल इंक, माइक्रोसॉफ्ट, सॅमसंग आणि गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंकच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना तंत्रज्ञानाच्या आधारावर आधार कार्डाचं कोडिंग करण्यास सांगितलं आहे.
यूनिक आइडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक अजय भूषण पांडे यांनी म्हटलं की, इंडस्ट्रीच्या लोकांनी विनम्रतेने सगळी गोष्ट ऐकली. पण अजून यावर कोणतंही आश्वासन नाही दिलं. मुख्यालयात यावर काम करण्यास सांगितलं असून सरकार आधार रजिस्टर्ड डिवाइसवर काम करत आहे.