नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये मूळची भारतीय १२ वर्षीय मुलीची बुद्धी ही अलबर्ट आईस्टाईन आणि स्टीफन हॅाकिंग पेक्षा सुद्धा फास्ट असल्याचं सांगितलं जात आहे. या मुलीला एक प्रमुख सोसायटीची सदस्य म्हणून आमंत्रित केलं गेलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजगौरी पवार मागील महिन्यात मॅनचेस्टरमध्ये 'ब्रिटिशर मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये सहभागी झाली होती आणि त्यात तिने 162 मार्क मिळवले. जो 18 वर्षापेक्षा कमी वयासाठी सर्वात जास्त आहे.


आता राजगौरीला नावजलेली उच्च सोसायटी 'मेन्सा आयक्यू'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे. बुद्धीमतेच्या जोरावर या परीक्षेमध्ये सहभागी होऊन राजगौरीने 162 मार्क मिळविले जे आईंस्टाईन आणि हॅाकिंगच्या संघर्षानुसार दोन मार्क जास्त होते.


मेन्साने सांगितल आहे कि मूळ भारताची असलेली ही मुलगी विलक्षण बुद्धीमतेची आहे. कारण जगभरामध्ये 20,000 लोकच इतके गुण मिळवण्यात यशस्वी होतात.
 
राजगौरीचे वडील सूरज कुमार पवार यांनी सांगितल की, 'हे तिच्या शिक्षकांशिवाय होणे कठीन होतं. माझ्या मुलीला शाळेतून पण पूर्ण सपोर्ट मिळाला आहे.'