मुंबई : मोबाईल युजर्संना कमी दरात इंटरनेट सेवा मिळावी म्हणून डाटाविंड कंपनी वर्चुअल नेटवर्क ऑपरेटरसाठी अर्ज करणार आहे. परवाना मिळाल्यानंतर ही कंपनी फक्त १०० रुपयात वर्षभर इंटरनेट सेवा देणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डाटाविंड कंपनीने मोबाइल वर्चुअल नेटवर्क ऑपरेटर योजनेत १०० कोटी रुपये गुंतवण्याची इच्छा वर्तवली आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनी म्हटलं आहे की, देशातील १०० कोटी लोकं अजुनही इंटरनेट सेवेपासून वंचित आहे. ग्रामीण भागात लोकं इंटरनेटसाठी १२०० रुपये नाही गुंतवू शकत. यामुळे त्यांची कंपनी फक्त १०० रुपयात वर्षभरासाठी इंटरनेट सेवा देणार आहे.


3जी आणि 4जी सपोर्ट करणारे मोबाइल फोन आणि टॅबलेट बनवणाऱ्या डाटाविंडच्या सीईओंनी म्हटलं आहे की, त्यांची कंपनी रिलायंस कम्युनिकेशन आणि टेलीनॉरसोबत मिळून ग्राहकांना १ वर्षासाठी मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करत आहे. इतर कंपन्यांसोबतही त्यांची चर्चा होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिवाळी आधी ही इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.