मुंबई : आयफोन विकत घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. अॅपल लवकरच आपल्या आयफोन ५एसच्या किंमतीत तब्बल ५० टक्क्यांनी कपात कऱणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोनच्या ५एसच्या किंमतीत कपात झाल्यास भारतात हा फोन केवळ १२ हजार रुपयांत उपलब्ध होईल. 


अॅपल लवकरच चार इंचाचा डिस्प्ले असलेला आयफोन एसई लाँच करणार आहे. या फोनची विक्री वाढवण्यासाठी अॅपल ५एसचा स्टॉक संपवणार आहे. आयफोन ५एसमध्येही चार इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन सध्या भारतीय बाजारात २२ ते २५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार अॅपलने आयफोन एसई लाँच केल्यानंतर ५एसच्या किंमतीत कपा होणार आहे. मात्र आता हे पहावे लागेल की भारतात आयफोन ५एसच्या किंमतीत कपात होते की नाही.