लॉस अँजलस : हॉलिवूडला रेड कार्पेट नवं नाही. तिथं कायमच कोणत्या ना कोणत्या सोहळ्याच्या निमित्तानं नाहीतर फिल्म रिलीजसाठी रेड कार्पेट अंथरलं जातं. पण सोमवारी झालेल्या एका सोहळ्याचा थाट काही निराळाच होता. ब्रिटनमधल्या एका सौंदर्यवतीचं लॉस एंजल्समध्ये लाँचिंग झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध मॉडेल मिरांडा केर, अभिनेत्री मिचेल रॉड्रिग्ज, गायक-गीतकार नील होरान यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी हॉलिवूडमध्ये रेड कार्पेट वॉक केला. पण तो कोणत्या फिल्म फेस्टिवलसाठी नव्हे. तर हे सगळे जमले होते एका नव्या सेलिब्रेटीचं भव्य स्वागत करायला.


द वन अँड ओन्ली जग्वारची नवी आय-पेस. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये जग्वारची एन्ट्री आय-पेसच्या निमित्तानं झाली आहे. जगप्रसिद्ध जग्वार ब्रँडचा एलिगन्स घेऊन इकोफ्रेंडली पथ्य पाळणाऱ्या या कारचं लाँचिंग लॉस एंजल्स ऑटो शोच्या निमित्तानं थेट हॉलिवूड स्टाईलनं झालं.