जिओ देणार ग्राहकांना मोठा झटका, बॅंक खात्यातून पैसे होणार कट!
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना वेलकम ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलची सुविधा दिली. ही सुविधा ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. मात्र, ही ऑफर संपल्यानंतर ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना वेलकम ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलची सुविधा दिली. ही सुविधा ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. मात्र, ही ऑफर संपल्यानंतर ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
जिओचे बिल भरले नाही तर तुमच्या बॅंक खात्यातून बिलाची रक्कम वळती होईल, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. तुम्ही रिलायन्स जिओची मोफत सेवा समजून कार्ड घेतली असतील त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण तुम्ही जास्त इंटरनेट डेटा वापरला असेल तर तुम्हाला बिल द्यावे लागेल. अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.
३१ मार्चनंतर ऑफर संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला बिल येण्याची शक्यता आहे. पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांना बिल भरावे लागणार आहे. जर तुम्ही बिल भरले नाही तर आधार कार्डच्या माध्यतातून बॅंक खात्यातून हे बिल वजावट होईल, अशी शक्यता सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. पण याबाबत अजून तरी जिओ कंपनीकडून अधिकृत कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.