नवी दिल्ली : रिलायन्स जिओने फ्री डेटा आणि कॉलिंगची ऑफर ग्राहकांना दिल्यानंतर आता इंटरनॅशनल कॉलिंग अर्थात आयएसडीबाबतही नवी ऑफर जाहीर केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओच्या नव्या रेट कटर ऑफरअंतर्गत ग्राहकांना अमेरिका आणि युकेमध्ये कॉलिंगसाठी प्रतिमिनिट केवळ ३ रुपये चार्ज होणार आहेत. 


काय आहे ही नवी ऑफर


जिओच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रेट कटर ऑफरसाठी ५०१ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. 


इतर टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढणार


तज्ञांच्या मते, रिलायन्स जिओच्या या नव्या ऑफरमुळे इतर टेलिकॉम कंपन्या भारतीय एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन या कंपन्यांवरही कॉल रेट कमी करण्यासाठीचा दबाव वाढू शकतो.