मुंबई : रिलायंस जिओने समर सरप्राईज ऑफर बंद झाल्यानंतर ग्राहकांना नव्या ऑफर देऊ केल्या आहेत. धन धना धन ऑफरनंतर सरकारने JioFi डिवाइससोबत एक नवी ऑफर आणली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

JioFi खरेदी केल्यास यूजर्सला 100 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. किंवा 1000 रुपयांचा 4जी डेटा ऑफर दिला जाणार आहे. या डिवाईसची किंमत 1,999 रुपये आहे. जर यूजरने नवं डिवाईस घेतलं तर त्यासोबत 1,000 रुपयांचे ऑफर्स दिले जाणार आहेत. म्हणजेच हा डिवाईस तुम्हाला ९९९ रुपयांना मिळणार आहे.


JioFi 100-percent cashback ऑफर देखील जिओकडून देण्यात आली आहे. जर यूजर्स जुन्या वाय-फाय डोंगलला एक्सचेंज करुन नवा JioFi डिवाइस घेता तर त्यांना 2,010 रुपयांचा फ्री 4जी डेटा दिला जाणार आहे. यूजर्सला डिवाईससाठी फक्त 1,999 रुपये द्यावे लागणार आहेत. ज्यानंतर युजर्सला त्याच्यापेक्षा अधिक डेटा दिला जाणार आहे. ही ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा जुनो डोंगल सुरु असेल.