नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आपल्या स्वस्त ऑफरद्वारे ग्राहक कायम ठेवण्याची स्ट्रॅटेजी यापुढेही कायम ठेवणार आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांसाठी जिओ मोठा डिस्काउंट देणाऱे प्लान्स कायम ठेवण्याच्या विचारात आहे तसेच अनेक नव्या प्लान्सचीही घोषणा करु शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ञांच्या मते, जिओच्या सबस्क्रिप्शनची संख्या कमी होऊ लागल्याने ग्राहक कायम ठेवण्यासाठी कंपनी ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. गेल्या वर्षी जिओने फ्री डेटा आणि कॉलिंगच्या ऑफरची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी जिओचा वापर सुरु केला होता. 


या वर्षीच्या मार्चपर्यंत ही फ्री ऑफर सुरु ठेवण्यात आली होती. मात्र एक एप्रिलपासून जिओने नव्या ऑफर सुरु केल्यात. मात्र त्यामुळे जिओला तब्बल रिलायन्स जिओला मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २२.५ कोटींचं नुकसान झालं आहे.