नवी दिल्ली : मोबाईल फोन निर्माता कंपनी जिवीने शुक्रवारी नवा फीचर फोन सुमो टी३००० लाँच केला. हा फोन एकदा चार्ज केल्यास ५० दिवसांचा बॅकअप देतो असा दावा कंपनीने केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोनची किंमत १,४९० रुपये इतकी आहे. यात २.८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. तसेच कॅमेराही देण्यात आलाय. यासोबतच ऑटो कॉल रेकॉर्ड, मोबाईल ट्रॅकर, टच लाईट, जीपीएस या सुविधाही आहेत.


जिवी मोबाईलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, फीचर सुमो टी३००० या फोनमध्ये शक्तीशाली बॅटरी देण्यात आलीये. ज्यामुळे तुम्हाला सतत हा फोन चार्ज करावा लागणार नाही.