२५१ रुपयांचा मोबाईलचा दावा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल
केवळ २५१ रुपयांत मोबाईल देण्याचा दावा करणाऱ्या `रिंगिंग बेल्स` या कंपनीच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. आता, कंपनीचे अधिकारी मोहित गोयल (प्रमोटर) आणि अशोक चड्ढा (अध्यक्ष) यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.
नवी दिल्ली : केवळ २५१ रुपयांत मोबाईल देण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. आता, कंपनीचे अधिकारी मोहित गोयल (प्रमोटर) आणि अशोक चड्ढा (अध्यक्ष) यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.
आयपीसी कलम ४२० नुसार, लोकांना गंडवण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. भाजप खासदार डॉ. किरीट सोमैय्या यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,. कंपनी अधिकाऱ्यांना त्यांचं २५१ रुपयांचा मोबाईल बनवणारं मॅन्युफॅक्टरिंग युनिट दाखवण्यासाठी विचारणा करण्यात आलीय.
'रिंगिंग बेल' भ्रामक जाहिराती देऊन आणि सोशल मीडियाद्वारे लोकांना गंडवून लोकांकडून पैसा उकळतेय, असं किरीट सोमेय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.
सर्वात स्वस्त असा मोबाईल उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या या कंपनीनं १८ फेब्रुवारीपासून फोन बुक करण्यासाठी लाखो लोकांकडून ऑनलाईन पैसे जमवलेत... या दरम्यान वेबसाईट अनेकदा क्रॅशही झाली होती.