नवी दिल्ली : 'लेनेवो' या मोबाईल कंपनीनं मंगळवारी आपला एक शानदार नवा कोरा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'वाइब के ५ प्लस' असं या फोनचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या वाइब सिरिजमधल्या या स्मार्टफोनची विक्री २३ मार्चपासून सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी तुम्हाला अगोदर कोणतंही रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. 


कंपनीनं ग्राहकांना यासोबतच एक खुशखबरही दिलीय. या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. 


'वाइब के ५ प्लस'चे फिचर्स


या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी Atmos साऊंड सिस्टम देण्यात आलाय. डॉल्बी सिस्टम बहुतेकदा महागड्या स्मार्टफोनमध्ये दिली जाते. 


'लेनोवो के ५ प्लस'ला अॅल्युमिनियम फिनिशिंग देण्यात आलंय. त्यामुळे, याच्या बॉडीचा लुक मेटल बॉडीप्रमाणे दिसतो. 


५ इंचाची स्क्रीन, १९२० X १०८० पिक्सल रेझोल्युशन


प्रोसेसर - ६१६ ऑक्टाकोर  


रॅम - २ जीबी 


बॅटरी - २७५० मेगाहर्टझ


इंटरनल मेमरी - १६ जीबी, (मेमरी कार्डच्या साहाय्याने वाढवता येऊ शकते)


रिअर कॅमेरा - १३ मेगापिक्सल, एलईडी फ्लॅशसहीत


फ्रंट कॅमेरा - ५ मेगापिक्सल


या स्मार्टफोनची किंमत आहो केवळ ८,४९९ रुपये.... हा स्मार्टफोन तुम्हाला बाजारात गोल्ड आणि सिल्व्हर या दोन कलर्समध्ये उपलब्ध होईल.