मुंबई : लेनोव्होनं 2017मधला पहिलाच स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लेनोव्हो P2 या नव्या स्मार्टफोनचा युएसपी आहे तब्बल 5100mAhची बॅटरी. याबरोबरच या स्मार्टफोनमध्ये 2GHzचा ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625चा प्रोसेसर आहे. 3 आणि 4GB रॅम आणि 32GBची इंटरनल मेमरी या स्मार्टफोनला देण्यात आली आहे.


काय आहेत या स्मार्टफोनची फिचर्स?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिस्प्ले : 5.5 इंच फूल एचडी (1080x1920पिक्सल), 2.5D गोरिला ग्साल आणि 401 पिक्सल पर इंचचा पीपीआय


प्रोसेसर : 2GHzचा ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625


ऑपरेटिंग सिस्टीम : अॅन्ड्रॉईड 6.0 मार्शमेलो


रॅम : 3GB आणि 4GB


मेमरी : 32GB इंटरनल आणि 128 GB एक्सपांडेबल


कॅमेरा : 13 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा


सीम : ड्युएल सीम (GSM+GSM)


कनेक्टिव्हिटी : वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यू टूथ, एनएफसी, यूएसबी ओटीजी, एफएम, 3G आणि 4G


किंमत : 3GB रॅम 16,999 रुपये आणि 4GB रॅम 17,999 रुपये


लेनोव्होचा हा स्मार्टफोन 12 जानेवारीपासून फक्त फ्लिपकार्टवरच मिळणार आहे.