मुंबई : लेनोवो झुकचा नवा स्मार्टफोन Zuk 2 Pro लॉन्च झालाय. या फोनमध्ये ६ जीबी रॅम असून  १२८ जीबी इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन व्हरायटी आहेत. यातील एकाची रॅम ४ जीबी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात अॅड्रॉईड ६.० मार्शमेलो सिस्टिम असून ५.२चा फूल डिस्प्ले आहे. हा क्लॉलकॉम स्नॅपड्रेगन ८२० प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम आहे. १२८ जीबी मेमरी असल्याने अन्य कार्डची गरज भारणार नाही.


दुसऱ्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये २.५ डी कर्व्ड ग्लास आहे. याची बॅटरी ३,१००एमएच असून क्लॉलकॉम क्विक चार्ज ३.० सपोर्ट आहे. त्यामुळे चार्जिग फास्ट होते.


या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल रिअर आणि ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. रिअर कॅमेऱ्यात फेस डिटेक्शन ऑटो फोकस (PDAF), F/2.0 अपर्चर आणि ड्युअल टोन एलईडी फ्लॅश आदी  फीचर्स लेस आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी यात ४ जी एलटीईसहित युएसबी टाईप सी, जीपीएस, वायफाय आणि ब्ल्युटूथ आदी फीचर्स आहेत. या स्मार्टफोनची किंमत २६९९ युआन (२७,६००) किंमत आहे.