इंटरनेट आणि बॅलेन्स नसतांना ही करा फ्री कॉलिंग
इंटरनेट नसतांना आणि टॉकटाईम नसतांना ही जर तुम्हाला फोनवर बोलता आलं तर...? पण आता हे शक्य होणार आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये फोनवर बोलू शकणार आहात.
मुंबई : इंटरनेट नसतांना आणि टॉकटाईम नसतांना ही जर तुम्हाला फोनवर बोलता आलं तर...? पण आता हे शक्य होणार आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये फोनवर बोलू शकणार आहात.
एका कंपनीने जाहीरातीसाठी ही सुविधा दिली आहे. तुम्हाला ही जर फ्री कॉलिंग करायची आहे तर त्यासाठी खालील गोष्टी फॉलो करा.
१. व्हील कंपनीच्या टोल फ्री नंबर 180020802080 वर मिस कॉल द्या.
२. काही सेंकदात तुम्हाला 806102**** नंबरवरुन कॉल येणार.
३. 'सलमान खान'च्या आवाजात तुम्हाला कोणत्या नंबरवर कॉस करायचाय तो नंबर विचारला जातो.
४. तुम्ही सांगितलेला नंबर पुन्हा तुम्हाला सांगितला जातो. तो बरोबर आहे की नाही हे तुम्हाला तपासता यावं म्हणून.
५. तुम्ही नंबर चेक केल्यानंतर कॉल कनेक्ट होतो.
कॉल कनेक्ट होण्याआधी व्हीलची काही सेकंदाची अॅड ऐकू येते. यानंतर तुमचा कॉल कनेक्ट केला जातो.
सूचना - तुम्ही एका वेळेत फक्त तीन मिनिटंच फोनवर बोलू शकता. यानंतर तुम्हाला पुन्हा कॉल कनेक्ट करावा लागतो.