मारुती सुझुकीची 4.59 लाख रुपयात इग्निस भारतात लाँच
भारतीय बाजारपेठेत आता मारुती सुझुकीची नवी इग्निस कार लॉन्च झाली आहे. या कारची किंमत 4.59 लाख रुपये आहे.
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत आता मारुती सुझुकीची नवी इग्निस कार लॉन्च झाली आहे. या कारची किंमत 4.59 लाख रुपये आहे.
गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 'इंडियन ऑटो एक्स्पो-२०१६' मध्ये इग्निस कारची पहिली झलक पाहायला मिळाली होती. इग्निस कार पुढील वर्षी येणार असल्याचे ऑटो एक्स्पो-२०१६ मध्ये सांगण्यात आले होते. मात्र, जानेवारी २०१७मध्येच ही कार भारतात दाखल झाली आहे.
या कारची विक्री मारुतीच्या प्रीमियम डिलरशिप नेक्साच्या माध्यमातून होणार आहे. आकर्षक स्टाईल आणि आधुनिक फीचर्स हे या कारचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पेट्रोलवर चालणारी कार, काही दिवसांतच डिझेलचा पर्यायही देण्याची शक्यता आहे. स्विफ्ट कारची दुसरीच आवृत्ती असल्याचे म्हटले जात आहे.
नव्या कारची आणखी काही मॉडेल्स