नवी दिल्ली : जपानची वाहन निर्मिती करणारी मित्सुबिशी या कंपनीने जेनेवा मोटर प्रदर्शनात ४०० किमी प्रती लीटर मायलेज देणारी लाँच केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारचा लूक जबरदस्त आहे. नवीन संकल्पना घेऊन ही कार लाँच करण्यात आली असून यात विविध सोयी-सुविधा आहेत. या कारला लिथिअम इयॉन सेल्स बॅटरी बसविण्यात आलेय.


या इलेक्ट्रिक व्हेकलची मोटर पुढे आणि रिअर, दोन्ही एक्सलला ७० केडब्ल्यू (एकूण १४० केडब्ल्यू) पर्यंत ताकत मिळते. ही एक इलेक्ट्रिक कार आहे. ही एकदा फुल चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर पर्यंत धावते.


सेमी ऑटोमोटिक ड्रायव्हींग कार


मित्सुबिशी एक्स कन्सेप्ट एक सेमी ऑटोमेटिक ड्रायव्हींग कार आहे. या कारमध्ये कॅमेरा आणि सेंसर्सची मदत युजर घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या आजुबाजूची माहिती मिळते. ही कार ड्रायव्हिंग लेन बदलताना कार स्वत: आपला स्पीड कमी आणि जास्त करु शकते.


याशिवाय एक खास फीचर आहे. हॉटेल्स, रेस्टोरंट्समध्ये कार पार्किंगची जागा शोधण्यास मदत करते. ही कार स्वत:च पार्किंग करु शकते.


५ लोक बसू शकतात, अशी या कारची रचना आहे. तसेच अधिकची पेसही मिळते. ही कार कधी बाजारात दाखल होऊन हे काही सांगण्यात आलेले नाही. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या सुविधा दिल्यात.