नवी दिल्ली : तीन वर्षापूर्वी मोहम्मद जीशानने मित्रांसोबत  एका प्रोजेक्टला सुरूवात केली होती. आज त्या स्टार्टअप प्रोजेक्टची किंमत  ५ कोटी इतकी आहे.  एमआरएम युनिवर्सिटीत शिकणाऱ्या २२ वर्षीय जीशान आणि त्याच्या मित्रांच्या ग्रुपने २०१३ मध्ये Inking pages नावाचा प्रोजेक्ट सुरू केला होता. तरूणांना करियर संबंधी माहिती देण्याच्या उद्देशाने या प्रोजेक्टची सुरूवात करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोजेक्टला सुरूवात करण्यासाठी जशीन आणि त्याच्या मित्रांनी आपल्या पालकांकडून ६० हजार कर्ज घेतले होते. सुरूवातीला सर्व विद्यार्थी मॅगजीन पब्लिश करत होते. त्यानंतर जीशान आणि त्याचे मित्रमंडळी समीर रमेश, फातिमा हुसैन, रूहान नकश यांनी मिळून Mycaptain.in नावाने एक मॉनिटरींग प्लॅटफॉर्म तयार केला. आता त्यांनी त्या एज्युकेशन स्टार्टअपला The climber असे नाव दिले आहे.


The climber च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करणारे एक वर्कशॉप चालवले जाते. स्टार्टअपचा पुढील उद्देश  भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये बदल घडवण्याचा आहे. स्टार्टअप वेबसाइटच्या मते, आत्तापर्यंत त्यांनी १५ हजार विद्यार्थ्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ९ शहरांमध्ये आत्तापर्यंत स्टार्टअपने काम केले आहे.