मुंबई : आज मदर्स डे आहे. आईचं स्थान जगामध्ये कोणीचं घेऊ शकत नाही. ती नेहमी आपल्या मुलांचा विचार आणि त्यांचा आनंद कशात आहे हेच बघत असते. मग आज 'मदर्स डे' निमित्ताने तुम्हीही आईला काही खास सरप्राईज देऊन तिला खुश करा. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. एक प्रेमाची मिठी : आईच्या जवळ जाऊन स्मितहास्याने प्रेमाने भरलेली एक मिठी देऊन 'मदर्स डे'च्या शुभेच्छा द्या. बघा मग तुमचा हसरा चेहरा बघून तिच्याही चेहऱ्यावर हास्याची कळी उमलेल.


२. आईसाठी काही भेटवस्तू घ्या : आईला अशी काही भेटवस्तू द्या की, ती भेटवस्तू बघून तिला समजलं पाहिजेत की, तुमच्या आयुष्यातील तिच्याविषयीच स्थान आणि तुम्हाला तिच्याविषयी असणार प्रेम. तिच्यासोबतच्या आठवणींची फोटो फ्रेमही तुम्ही तिला भेट म्हणून देऊ शकता.


३. आज आईला सर्व कामांपासून सुट्टी द्या : आई नेहमी सगळ्यांसाठीच धावपळ करत असते. आजचा दिवस तिला सर्व कामांपासून सुट्टी द्या. तिला संपूर्ण आराम द्या. मग तिला ही खूप बरं वाटेल.


४. आज तुम्ही स्वत: जेवण करुन आईला द्या : नेहमी आई आपल्याला आवडीच्या गोष्टी बनवून देते. मग आज तुम्ही स्व:च्या हाताने जेवण करा आणि तिला खाऊ घाला.


५. तिला बाहेर फिरायला घेऊन जा : आज आईला तिच्या आवडीच्या ठिकाणी किंवा तिने कधीच न पाहिलेल्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. जेणेकरुन तो क्षण तिच्या नेहमी लक्षात राहील.