...फेसबुकवर झाला खुन्याचा पर्दाफाश!
जॉय मेकॉडो नावाच्या मुलीचा खून झाल्यानंतर तिच्या खुन्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांना फेसबुकनं मदत केलीय.
नवी दिल्ली : जॉय मेकॉडो नावाच्या मुलीचा खून झाल्यानंतर तिच्या खुन्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांना फेसबुकनं मदत केलीय.
जखमी आणि गंभीर अवस्थेत जॉय मेकॉडो हिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ज्या युवकानं जॉय हिला हॉस्पीटलमध्ये आणलं होतं तो रोडनी हा तिचा बॉयफ्रेंड होता. रस्त्यात आपल्याला काही लोकांनी जबर मारहाण केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं... त्यानंतर तो गायब झाला तो परत आलाच नाही. जॉयच्या मित्रांपैकी रोडनीला कुणीही ओळखत नव्हतं.
जॉय हिच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. तिनं हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. तिच्या मित्रांनी फेसबुकवर 'Justice for Jhoy Mercado - Edgel Durolfo' नावाचं पेज बनवलं.
त्यानंतर काही दिवसांनी फेसबुकच्या या पेजवर अचानक कुणीतरी जॉय आणि रोडनीचा फोटो पोस्ट करण्यात आला... आणि कॅप्शनमध्ये या तरुणाला शोधण्याचं अपील करण्यात आलं... त्यानंतर पोलिसांनी रोडनीला शोधून काढलं... आणि जॉयच्या हत्येकऱ्याचाही पत्ता लागला. रोडनीनंच जॉयला मृत्यूच्या दाढेत ढकललं होतं.
जॉय-रोडनीचा हा फोटो कुणी पोस्ट केला असावा, याचे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.