मुंबई : तुम्ही कधी जादूचे प्रयोग पाहिले असतील तर कधीकधी त्यातला जादूगार त्याच्याकडील दोरखंडाची आपोआप गाठ बांधत असल्याचा प्रयोग तुम्ही पाहिलाच असेल. आता अशीच जादू तुम्हालाही करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला नाईकी कंपनीचे हे नवीन शूज विकत घ्यावे लागतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाईकी कंपनीने नव्याने लाँच केलेल्या शूजच्या नाड्या आपोआप बांधल्या जातात. 'हायपर अडाप्ट १.०' असे या नव्या शूजचे नाव आहे. ग्राहकांनी हे शूज पायात घालताच आवश्यकतेप्रमाणे या शूजची नाडी आपोआप बांधली जाते, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आलाय. 


दिसायला आकर्षक असलेले हे शूज बाजारात कधी उपलब्ध होणार याची नाईकीने काहीच घोषणा केलेली नाही. तसेच या शूजची किंमत काय असेल त्याचीही काही घोषणा झालेली नाही. पण, ज्यांना शूजची नाडी बांधता येत नाही त्यांच्यासाठी नाईकीने मात्र चांगली सोय केलीय असं म्हणायला हवं.