आता एका व्हॉट्सअॅप ग्रुपने २५६ जणांशी जोडले जा
मुंबई : इंस्टन्ट मॅसेजिंग अॅप `व्हॉट्सअॅप`ने आता आपल्यात सुधारणा केली आहे.
मुंबई : इंस्टन्ट मॅसेजिंग अॅप 'व्हॉट्सअॅप'ने आता आपल्यात सुधारणा केली आहे. यापुढे एका ग्रुपमध्ये २५६ इतके सदस्य अॅड करता येणार आहे.
सुरुवातीला एका ग्रुपमध्ये ५० जणांचा समावेश करता येत होता. त्यानंतर ही संख्या १०० वर नेली. पण, आता त्याहीपुढे जात ही संख्या २५६ इतकी केली आहे.
अनेकांना आपल्या वर्गाचा, मित्र मैत्रिणींचा, कंपनीतील कर्मचाऱ्यांचा एक ग्रुप बनवायचा असेल तर या सदस्य संख्येच्या बंधनामुळे अडचणी येत होत्या. हीच बाब लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने हा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअॅपने नुकताच १ अब्ज युजर्सचा टप्पा पार केला आहे, अशी घोषणा फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने केली होती.