मुंबई : तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यायत, पण नुसतं फेसबुकवर 'हॅपी बर्थडे' लिहायचं नाहीये? तर मग आता फेसबुकने तुमची समस्या सोडवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबूकने अॅपलचे आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक नवीन सुविधा लाँच केलीये. या नव्या फिचरमुळे आता तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणीला लाईव्ह शुभेच्छा देता येणार आहे. यामुळे आता तुम्ही १५ सेकंदांचा एक लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करुन मित्र-मैत्रिणीच्या टाईमलाईनवर पोस्ट करता येणार आहे. 


अँड्रॉईड यूजर्सना मात्र हे फीचर त्यांच्या मोबाईलवर येण्यासाठी अजून काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. 


हे फीचर कसं वापराल?


आयफोनवर फेसबूक अॅपवरुन आपल्या मित्राच्या प्रोफाईलवर जा.


'व्हिडिओ प्रॉम्प्ट' हा बॅनर सिलेक्ट करुन व्हिडिओची थीम निवडा.


'रेकॉर्ड व्हिडिओ'वर प्रेस करुन व्हिडिओ तयार करा.


फेसबुकवर शेअरिंगसाठी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करुन मित्रांच्या वॉलवर व्हिडिओ शेअर करा.