मुंबई : अपरिचीत वा परिचीत व्यक्तीला कॉल करण्याचा प्रॅन्क तुम्ही कधीतरी केला असेलच... मात्र ट्रूकॉलरमुळे तुम्ही पकडले गेले असाल, पण तुम्हाला माहितेय का, की असेदेखील एक अॅप आहे ज्याने तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला मात्र वेगळाच नंबर दिसेल.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गूगल प्ले स्टोर आणि अॅपल स्टोरवर 'टेक्स्ट मी' नावाचे हे अॅप आहे. या अॅपने तुम्ही कोणाही व्यक्तीला कॉल किंवा मेसेज करू शकता आणि समोरच्याला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही.

कसे काम करते हे अॅप

या अॅपच्या मदतीने यूजर अनेक नंबर सेट करू शकतो. तुम्ही कोणताही नंबर सेट करू शकता. जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा तुमचा नंबर न दिसता तुम्ही सेट केलेला नंबर समोरच्या व्यक्तीला दिसेल.

एकच नंबर जर सेट केला तर हे अॅप फ्रि आहे. मात्र एकहून अनेक नंबर वापरायचे असल्यास महिन्याला ६० रूपये भरावे लागतील.