मुंबई : Oppo F3 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीने याची किंमत 19990 रुपये ठेवली आहे. याची विक्री १३ मे पासून सुरु होणार आहे. या नव्या स्मार्टफोनला फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिवली खरेदी करु शकता. ग्राहक यासाठी ऑफलाइन पद्धतीने Oppo च्या स्टोर्सवर प्री ऑर्डर करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Oppo F3 हा गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये Corning Glass 5 प्रोटेक्शनसह 5.5 इंचची फुल HD 2.5D कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे.


स्मार्टफोनमध्ये Mali T86-MP2 सोबत 1.5GHz ऑक्टाकोर Mediatek MT6750T प्रोसेसर दिलं गेलं आहे. कंपनीने यामध्ये 4GB रॅम आणि 64GB चं इंटरनल स्टोरेज दिलं आहे. 128GB एक्सापांडेबल मेमरीमध्ये देण्यात आली आहे.


Oppo F3 अँड्रायड 6.0 मार्शमेलोवर चालणार आहे. बॅटरी 3,200mAh ची दिली असून ती नॉन रिमूवेबल आहे. यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 4.1 आणि GPS देण्यात आलं आहे. ग्राहकाला यामध्ये हाइब्रिड डुअल सिम (नैनो+नैनो) सपोर्ट मिळेल. यामध्ये फ्रंट फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.