मुंबई : पॅनासोनिकनं फक्त 5,990 रुपयांमध्ये 5,000 mAh एवढी बॅटरी असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. P75 असं या स्मार्टफोनचं मॉडेल आहे. एवढी दमदार बॅटरी असणारा भारतातला हा कदाचित पहिलाच स्मार्टफोन असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोनबरोबरच 400 रुपयांचं स्क्रीन गार्डही देण्यात येणार आहे. या फोनची स्क्रीन 5 इंचाची आहे, तर ड्यूअल सीम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टीम आहे. याबरोबरच या स्मार्टफोनमध्ये 1.3 GHZ क्वाडकोर प्रोसेसर, 1 GB रॅम, 8 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. 


32 GBचं मायक्रो एसडी कार्ड टाकून या फोनची मेमरी वाढवता येऊ शकणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगा पिक्सला फ्रंट कॅमेरा आहे.