मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर फेसबुक-व्हॉटसअॅपवर युद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर युद्ध सुरू झालं आहे, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपल्या पक्ष नेत्यांची बाजू सावरताना दिसत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, किंवा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, हे त्या-त्या पक्षातले नेते-कार्यकर्ते सांगण्यास गुंतले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर युद्ध सुरू झालं आहे, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपल्या पक्ष नेत्यांची बाजू सावरताना दिसत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, किंवा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, हे त्या-त्या पक्षातले नेते-कार्यकर्ते सांगण्यास गुंतले आहेत.
सोशल मीडियावर सडकी युती, अहंकार, २१ तारखेला पाणी पाजणार, तुमचं आमचं नातं काय?, अशा विषयांवर भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये युद्ध सुरू आहे. आता शिवसेना आणि मनसे याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, यानंतर सोशल मीडियावर आणखी 'पोस्ट वार' सुरू होणार आहे.