मुंबई : अरेंज मॅरेजमधील पहिल्या भेटीत विचार करुन समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारले पाहिजेत. एक चुकीचा प्रश्न तुमचे इंप्रेशन खराब करु शकतो. समोरच्या व्यक्तीला आपण ओळखत नसतो त्यामुळे भेटीदरम्यान चुकीचा एखादा प्रश्न त्या व्यक्तीसमोर आपले इंप्रेशन बिघडवू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. पगाराबाबत विचारणे - असं म्हटलं जात की महिलांना त्यांचे वय आणि पुरुषांना त्यांचा पगार विचारु नये. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या भेटीत कधीही मुलांना त्यांचा पगार विचारु नका. असा प्रश्न विचारल्यास मुलांना वाटेल की मुलीला पैसा अधिक प्रिय आहे. 


२. जुन्या नात्यांबाबत विचारणे - पहिल्या भेटीत कधीही समोरच्या व्यक्तीला त्याच्या जुन्या नात्यांबद्दल विचारु नये. जेव्हा तुम्ही एकमेकांना चांगले जाणून घ्याल तेव्हा विचारणे योग्य ठरु शकते. 


३. महिन्याचा खर्च किती? - लग्न ठरवतानाच्या पहिल्याच भेटीत समोरच्या मुलाला वा मुलीला महिन्याचा खर्च किती हा प्रश्न विचारु नये. त्यामुळे तुमचे इंप्रेशन खराब होते. याउलट तुम्ही त्या व्यक्तीला त्याची आवडनिवड, छंद याबाबत विचारा


४. किती जणांना रिजेक्ट केलं. - पहिल्याच भेटीत तुम्ही मुलाला अथवा मुलीला यापूर्वी किती जणांना रिजेक्ट केलं हा प्रश्न विचारु नका. 


५. तुझे आई-वडील तुझ्यावर अवलंबून आहेत का? - लग्नाआधी कोणत्याही मुलीला अथवा मुलाला तुझे आई-वडील तुझ्यावर अवलंबून आहेत का? असा प्रश्न विचारु नये.