केळीच्या सालीवर काळे डाग असतानाही खाताय का? मग आधी हे वाचून घ्या

केळ हे कार्बोहायड्रेटसाठीही चांगलं माध्यम आहे. हे खाल्ल्याने डायबेटिज नियंत्रणात येऊ शकतो. तसंच प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि हाडंही मजबूत होऊ शकतात. याशिवाय किडनीलाही फायदा होऊ शकतो.   

Shivraj Yadav | Jan 29, 2025, 20:35 PM IST

केळ हे कार्बोहायड्रेटसाठीही चांगलं माध्यम आहे. हे खाल्ल्याने डायबेटिज नियंत्रणात येऊ शकतो. तसंच प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि हाडंही मजबूत होऊ शकतात. याशिवाय किडनीलाही फायदा होऊ शकतो. 

1/9

केळ हे एक असं फळ आहे जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. हे फळ प्रत्येक ऋतूत उपलब्ध असतं आणि भारताच्या प्रत्येक भागात मिळतं.  

2/9

केळीमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी 6, पोटॅशिअम, सोडिअम, आयर्न आणि वेगवेगळे एंटीऑक्सिडेंट आणि फायटोन्यूट्रिसन्स असतात.   

3/9

केळ हे कार्बोहायड्रेटसाठीही चांगलं माध्यम आहे. हे खाल्ल्याने डायबेटिज नियंत्रणात येऊ शकतो. तसंच प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि हाडंही मजबूत होऊ शकतात. याशिवाय किडनीलाही फायदा होऊ शकतो.   

4/9

पण अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की केळ जास्त पिकलं असेल तर खाऊ नये, कारण त्यामुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.   

5/9

पण हे खरं आहे का? केळीच्या सालीवर काळे डाग असणं याचा अर्थ ते खराब झालं असा आहे का? जाणून घ्या सत्य  

6/9

तज्ज्ञांनुसार, केळीच्या सालीवर काळे डाग असणं ते खराब नव्हे तर पिकल्याचं लक्षण आहे.  

7/9

केळीवर काळे डाग TNF म्हणजेच Turmor Necrosis Factor दर्शवतात. TNF कॅन्सरशी लढणारा पदार्थ आहे. केळीच्या सालीवर जितके जास्त काळे डाग तितकं त्यात जास्त TNF आहे.   

8/9

पिकलेल्या केळीत जास्त अँटीऑक्सिडेंट असतात, जे प्रतिकारशक्तीसाठी चांगलं आहे. पिकलेलं केळ हाय बीपी असणाऱ्यांसाठी चांगलं असतं. हार्ट रुग्णांसाठीही  केळीचं सेवन चांगलं आहे. त्यात ते पचनालाही मदत करतं.   

9/9

नॅच्यूरल अँटी अॅसिड असल्याने केळ अॅसिडीटीमध्ये फायदेशीर ठरतं. तसंच ह्रदयातील जळजळपासून दिलासा देतं.   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x