मुंबई : रिलायंस जिओ घेण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. सोमवारपासून हे सिमकार्ड विक्रीस येणार आहे. पण जिओच्या या ऑफरमध्ये काही गोष्टी लपल्या आहेत. ज्या सांगितल्या गेलेल्या नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन टेरिफ डिटेलबाबत वाचता तेव्हा काही गोष्टी तुम्हाला कळतील.


- कंपनीकडून म्हटलं गेलं आहे की, ३१ डिसेंबरपर्यंतच अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे. 


- यामध्ये 4 जीबीची लिमिट आहे. तुम्ही एका दिवसात फक्त जास्तीत जास्त 4 जीबी डेटा वापरु शकता. त्यानंतर स्पीड  128Kbps होऊन जाईल.


- लॉन्चिंग दरम्यान म्हटलं होतं की 50 रुपयात एक जीबी इंटरनेट देणार आणि रात्री अनलिमेटेड डेटा तुम्ही वापरु शकता. पण तुम्हाला माहित आहे अनलिमिटेड डेटाची वेळ काही आहे. ती १२ नंतर नसून 2 ते सकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.