मुंबई : रिलायन्स जिओ 4जीच्या ग्राहकांना कंपनीनं आणखी एक गुड न्यूज दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ईटी' वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चनंतर आणल्या जाणाऱ्या नव्या टेरिफ प्लाननुसार, ग्राहकांना कॉलिंगसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. जिओच्या ग्राहकांना केवळ इंटरनेटच्या वापरासाठी 100 रुपयांचं शुल्क भरावं लागेल... हे तीन महिन्यांसाठी वैध असेल म्हणजेच 30 जूनपर्यंत ते वैध राहील. 


रिलायन्स जिओ अजूनही लोकांच्या पसंतीस उतरतील अशा योजनांवर काम करत आहे. कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये आपली मोबाईल सर्व्हिस लॉन्च केली होती. सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत फ्री कॉलिंग आणि डाटा सर्व्हिस मोफत देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. 


परंतु, यानंतर कंपनीनं 2017 साठी हॅप्पी न्यू ईअर प्लान लॉन्च केला. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री डाटाची लिमिट प्रतिदिन 1 जीबीपर्यंत मर्यादित करण्यात आली होती.