मुंबई : रिलायंस जिओने अनेक टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. मोबाईल नेटवर्क कंपन्यांना धक्का दिल्यानंतर आता रिलायन्स डीटीएच सर्विसला बाजारात उतरवत आहे. जियोकेअर डॉट नेटच्या माहितीनुसार जिओ लवकरच डीटीएच सर्विस लॉन्च करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीटीएचसोबत ब्रॉडबँड कनेक्शन देण्याची तयारी देखील रिलायन्स जिओ करत आहे. जिओची डीटीएच सर्विस सर्वात स्वस्त असणार आहे. कंपनीने अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही.


जिओ ब्रॉडबँड सर्विस आणि जिओ डीटीएस सेवा दोन्ही एकत्र सुरु होण्याची शक्यता आहे. अन्य कंपन्यांची डीटीएच सर्विस आणि जिओ डीटीएचमध्ये खूप अंतर असणार आहे.


कंपनी स्मार्ट सेट अप बॉक्स सोबत जिओ बॉडबँड कनेक्शन देण्याची योजना बनवत आहे. या द्वारे हाय इंटरनेट स्पीड देण्याचा दावा केला जात आहे. 


कंपनी इंटरनेट सेट अप बॉक्सच्या माध्यामातून ऑनलाइन टीवी चॅनल्स आपल्या टीव्हीवर दाखवण्याचा दावा करत आहे. जिओ ब्रॉडबँड सर्विसवर आधीपासून काम करत आहे आणि ऑप्टिकल फायबर केबल सगळ्या शहरांमध्ये पोहोचवत आहे.


जिओची डीटीएच मे महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. रिलायंस जिओ डीटीएचची ऑनलाइन बुकिंग लवकरच सुरु होणार आहे.