नवी दिल्ली : रिलायन्सनं समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घ्यावी लागली असली तरी 'जिओ'नं हार पत्करलेली नाही. यामुळे आपल्या हिरमुसलेल्या ग्राहकांना पुन्हा खूश करण्यासाठी जिओनं पुन्हा एकदा 'धन धना धन' नावाची ऑफर ग्राहकांसमोर आणलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा सगळ्या कंपन्यांना डाटाच्या शर्यतीत मागे टाकण्यासाठी जिओनं आणलेल्या 'धन धना धन' ऑफरमध्ये ग्राहकांना, तीन महिन्यांसाठी अनलिमिटेड डाटा वापरू शकतील. ही ऑफर ३०९ आणि ५०९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. 

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच घोषित केलेली ३४९ रुपयांच्या प्लानऐवजी जिओ प्राईम उपभोक्त्यांना ८४ दिवसांसाठी ८४ जीबीपर्यंत डाटा वापरण्यासाठी मिळेल. यासाठी त्यांना ३०९ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. 


तर दुसरीकडे ५०९ रुपयांचा रिचार्ज करणाऱ्यांना ८४ दिवसांसाठी १६८ जीबी डाटा वापरण्यासाठी मिळेल. याआधी जिओनं ५४९ रुपयांमध्ये २८ दिवासांसाठी ५६ जीबी डाटाची ऑफर जाहीर केली होती.