मुंबई : रिलायन्स जिओचे सिमकार्ड मिळवणे जरी कठीण असले तरी रिलायन्सचा JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट आता दुकांनामध्ये यूझर्सना मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओने 2600 mAh बॅटरी आणि Oled डिस्प्लेसह वायरलेस हॉटस्पॉट लाँच केलाय. याची किंमत 1,999 रुपये आहे. भारतातील काही शहरांमध्ये हा वायरलेस हॉटस्पॉट मिळण्यास सुरुवात झालीये.


यात तुम्ही मायक्रोएसडी कार्डचा वापर करुन मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवू शकता. जिओच्या वेलकम ऑफर अंतर्गत 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला फ्री डेटा मिळणार आहे. 


रिलायन्स JioFiच्या एका डिव्हाइसने एका वेळी 10 लोक नेटचा वापर करु शकता. तसेच हा पोर्टेबल असल्याने कुठेही नेऊ शकता. एकदा चार्ज केल्यावर पुढील 5 तासांपर्यत हा चालतो.