मुंबई : रिलायन्स जिओनं आपल्या 'धन धना धन' ऑफरनंतर आता प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स अपडेट केलेत.
 
'धन धना धन' ऑफरमध्ये ग्राहकांना 309 रुपयांच्या रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल आणि 1 जीबी फोर जी डाटा प्रती दिवसांची सुविधा तर 509 रुपयांच्या रिचार्जमध्ये हीच लिमिट 2 जीबी सुविधा दिली गेलीय. याशिवाय 149 रुपयांचा प्रीपेड प्लानही आहेच... आता मात्र जिओनं आपले प्लान अपडेट करत नवे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स सादर केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रीपेड युजर्शसाठी सर्वात स्वस्त प्लान आहे अवघ्या 19 रुपयांचा... एका दिवसासाठी व्हॅलिड असणारा या प्लानमध्ये प्राईम मेम्बर्सना अनलिमिटेड कॉलसोबतच 200 एमबी डाटा मिळेल. तर नॉन प्राईम मेम्बर्सना केवळ 100 एमबी डाटा मिळेल. 


प्रीपेड ग्राहकांसाठी यानंतर 49 रुपये (3 दिवस व्हॅलिड), 96 रुपये (7 दिवसांसाठी), 149 रुपये (28 दिवसांसाठी) असेही प्लान्स सादर केलेत. 


याच पद्धतीन पोस्टपेड ग्राहकांसाठीही तीन नवे प्लान्स सादर करण्यात आलेत. रिलायन्स जिओच्या इतर प्लान्सचा लाभ घेण्यासाठी जिओ प्राईम सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे. याशिवाय 309, 509, 999, 1999, 4999 आणि 9999 रुपयांचे प्लानही जिओकडून उपलब्ध करून देण्यात आलेत.