नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ सिमच्या वेलकम ऑफर घेण्यासाठी लोकांमध्ये खूप क्रेज होते. ऑफर लॉन्च झाल्यावर रिलायन्स डिजिटल स्टोर, रिलायन्स मनिट स्टोअर बाहेर लांबचा लांब रांगा लागल्या होत्या. खूप प्रयत्नानंतर रिलायन्स जिओचे सिम मिळत होते. आता बाजारात धक्के खाण्याची गरज नाही. तुम्हांला घरात बसून जिओ सिम ऑर्डर करू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओने आपल्या सिमची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीचा युजर बेस वाढविण्यासाठी कंपनीने ही नवीन पद्धत सुरू केली आहे. यात तुम्ही ऑनलाइन जिओ सिम ऑर्डर करू शकतात.  


कसा ऑर्डर करणार जिओ सिम?  


जिओ सिम घरी मागविण्यासाठी तुम्हांला तुमच्या मोबाईल स्मार्टफोनवर माय जिओ अॅप इन्स्टॉल करा. या अॅपला इन्स्टॉल केल्यानंतर त्यात रिलायन्स जिओ वेलकम ऑफर कोड जनरेट होईल. त्या कोडच्या मदतीने तुम्हांला जिओच्या वेबसाइटवर पर्सनल डिटेल्स भराव्या. त्यानंतर तुम्ही जिओ सिम मागवू शकता. 


संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या घरी रिलायन्स जिओ एक्झीक्युटीव्ह येईल, तो आधार नंबर घेईल. त्याला आधारची माहिती द्यावी लागले. त्याचाकडे एक ईकेवायसी डिव्हाइस असेल त्यात तुमच्या फिंगर प्रिंटने तुमची माहिती मिळेल आणि त्यामुळे कोड जनरेट होईल आणि तुम्हाला अॅक्टीवेड सिम मिळेल.