मुंबई : 4G इंटरनेटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना एअर एशिया विमानाच्या तिकीटांमध्ये १५ टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानाच्या तिकीटांसाठी ही ऑफर लागू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी ग्राहकांना एअर एशियाचं ऍप डाऊनलोड करावं लागणार आहे. १७ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान यासाठी तिकीट बूक करावं लागणार आहे तर २० जून २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये ग्राहकांना एअर एशियाच्या या तिकीटावर प्रवास करावा लागणार आहे.