९३ रुपयांत १० जीबी ४जी डेटा
२जी, ३जीला मागे सारत सध्या ४जीचे युग सुरु झालेय. मात्र अनेकांना हा डेटापॅक परवडत नसल्याने काहीजण अद्यापही २जी आणि ३जीचा वापर करतायत. मात्र रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत आहे.
मुंबई : २जी, ३जीला मागे सारत सध्या ४जीचे युग सुरु झालेय. मात्र अनेकांना हा डेटापॅक परवडत नसल्याने काहीजण अद्यापही २जी आणि ३जीचा वापर करतायत. मात्र रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत आहे.
या ऑफरअंतर्गत ९३ रुपयांत तुम्हाला १० जीबी ४जी डेटा वापरता येणार आहे. लवकरच ही सुविधा सुरु होणार आहे. मात्र ही सुविधा केवळ सीडीएमए ग्राहकांना मिळणार आहे.
सध्या ही सुविधा आंध्रप्रदेश, दिल्ली, गुजरात, कोलकाता, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश(पूर्व), उत्तर प्रदेश(पश्चिम), मुंबई, ओदिशा, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर जुलैपर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थानसह सहा सर्कलमध्ये ही सुविधा विस्तारित केली जाईल.
इतर कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओची ही सुविधा स्वस्त असल्याने ग्राहकांना कमी खर्चात इंटरनेटचा वापर करता येणार आहे.