मुंबई : जेव्हापासून रिलायंसने जिओ मार्केटमध्ये लॉन्च केला आहे तेव्हापासून जिओ वेगवेगळे रेकॉर्ड स्थापिक करत चालली आहे. दूरसंचार नियामक ट्रायच्या नव्या रिपोर्टनुसार डाउनलोड स्पीडमध्ये मार्च महिन्यापर्यंत रिलायंस जिओ टॉपवर होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्यामध्ये रिलायंस जिओची डाउनलोड स्पीड 18.48 एमबी प्रती सेकंड एमबीपीएस होती. आतापर्यंतचा हा कंपनीचा सर्वात चांगला रिझल्ट होता. ट्रायच्या आंकड्यांनुसार मार्चमध्ये भारती एयरटेलच्या नेटवर्कवर डाउनलोड स्पीड एक एमबीपीएसने घडली असून ती 6.57 Mbps होती.


वोडाफोन या यादीत तीसऱ्या क्रमांकावर आहे. या मोबाईल नेटवर्क कंपनीचा डाऊनलोड स्पीड 6.14 Mbps होता. आयडियाचा डाउनलोड स्पीड 2.34 एमबीपीएसने घटला आहे. आयडियाचा स्पीड 5.9 Mbps झाला आहे.


एयरसेलची डाऊनलोड स्पीड 2.01 Mbps होती तर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलची डाऊनलोड स्पीड 1.99 Mbps होती.