मुंबई : टेलीकॉम मार्केटमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ लॅपटॉप मार्केटमध्ये देखील उतरणार आहे. Jio सिमसोबत कंपनी आता लॅपटॉप देखील तयार करणार असल्याचं बोललं जातंय. Jio ने आधीच LYF सीरीजचे स्मार्टफोन्स देखील लॉन्च केले आहे. यासोबतच अनेक डिवाईस देखील आणले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅपटॉपमध्ये जिओ सिमचं इंटरनेट वापरता येणार आहे. यासाठी कोणतंही डोंगल लावण्याची गरज नसणार आहे. हा लॅपटॉप 13.3 इंच स्क्रीनचा असणार आहे. प्रवास करत असतांन देखील तो हाताळणं सहज शक्य होणार आहे. वेब ब्राउजिंगवर यामध्ये विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यामध्ये 4G कनेक्टिविटी असणार आहे सोबतच तो VoLTE सपोर्ट करणारा असणार आहे.


Jio लॅपटॉप फॉक्सकॉन ही कंपनी बनवणार आहे. या लॅपटॉपमध्ये डाव्या बाजुला सिमसाठी स्लॉट देखील दिलं जाणार असल्याचं बोललं जातंय. हा फूल एचडी स्क्रिनचा लॅपटॉप असणार आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी देखील एसडी कॅमेरा दिला जाणार आहे. हा हेवी कामासाठी नसणार आहे. यामध्ये Intel Pentium quad core processor दिलं जाणार आहे. 4GB किंवा 6GB रॅम यामध्ये दिला जाऊ शकतो. मॅकबुकप्रमाणे यामध्ये 128GB एसएसडी ड्राइव दिली जाऊ शकते. या लॅपटॉपचं वजन 1.2 किलो असणार आहे. हा 12.2mm स्लीम असणार आहे. यामध्ये न्यूमरिक पॅड नसणार आहे.


रिलायन्स जिओने लॅपटॉपबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण Jio Set Top box प्रमाणे त्याचा फोटो देखील लीक झाला आहे.