सॅमसंगच्या स्मार्टफोनवर तीन महिन्यांपर्यंत फुकट अनलिमीटेड इंटरनेट
सॅमसंगचा स्मार्टफोन आणि रिलायंस जिओचं सीमकार्ड वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.
मुंबई : सॅमसंगचा स्मार्टफोन आणि रिलायंस जिओचं सीमकार्ड वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जीओ प्रीव्ह्यू ऑफरमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोनवर रिलायंस तीन महिन्यांपर्यंत फुकट अनलिमीटेड इंटरनेट सुविधा देणार आहे. याआधी रिलायंसनं LYF या स्मार्टफोन कंपनीबरोबर अशीच पार्टनरशीप करून ही ऑफर दिली होती.
या ऑफरमध्ये अनलिमीटेड डेटा, एचडी व्हॉईस, व्हिडिओ कॉलिंग, एसएमएस या सुविधा आहेत. ही ऑफर आत्ताचे सॅमसंग युजर्स आणि नवीन ग्राहकांनाही उपलब्ध होणार आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी A5M A5, गॅलेक्सी S6, गॅलेक्सी S6 एज, गॅलेक्सी S7, गॅलेक्सी S7 एज या स्मार्टफोनवर ही ऑफर आहे.
ही सुविधा सुरु करण्यासाठी स्मार्टफोनवर myjio अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. याबरोबच तुम्हाला जवळच्या रिलायंस जीओ स्टोरमध्ये जावं लागेल आणि काही कागदपत्र जमा करावी लागतील. यानंतर तुम्हाला पुढच्या ९० दिवसांसाठी इंटरनेट सुविधा फुकट मिळणार आहे.