मुंबई : स्टेट बँकेच्या सिस्टममध्ये व्हायरस गेल्याच्या भीतीने बँकेने ६ लाख कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत. हे प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं बँकरकडून सांगण्यात येत आहे. मात्र ग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता कार्ड्स ब्लॉक झाल्याने ग्राहक गोंधळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशयास्पद ट्रान्झॅक्शन्स आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. इतर बँकांच्या काही एटीएममध्ये ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीला धोका पोहचवणारे बग शिरले आहेत. ज्या ग्राहकांनी असे एटीएम वापरले आहेत, त्यांना हा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसबीआयने ६  लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.


 ब्लॉक केल्यानंतर बँकेकडून ईमेल आणि एसएमएस पाठवण्यात आले. संबंधित ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड्स दिली जातील. त्यासाठी आपापल्या ब्रँचमध्ये नव्या कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे, ज्यांचं कार्ड ब्लॉक झालं त्यांनी नव्या कार्डसाठी बँकेत जाऊन फॉर्म भरण्याचं आवाहन बँकेने केलं आहे.


भारतीय बँकिंगच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना मानवी जात आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कुठलीही पूर्वसूचना न देता कार्ड्स अचानक ब्लॉक झाल्यामुळे कार्डहोल्डर हैराण झाले आहेत. 


एसबीआयकडून जुलै अखेरपर्यंत 20.27 कोटी डेबिट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. यामध्ये एसबीआयच्या सब्सिडरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रवणकोर आणि स्टेट बँक ऑफ पटियाला यांचा समावेश आहे.0.25 टक्के कार्ड्स ब्लॉक करण्यात आल्याचं एसबीआयचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शिवकुमार भसीन यांनी म्हटलं आहे.