`चॅम्प इंडिया सी वन`... ५०१ रुपयांत स्मार्टफोन!
`रिंगिंग बेल्स` या कंपनीनंतर आता `चॅम्पवन` या कंपनीनं सर्वात स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचा दावा केलाय.
मुंबई : 'रिंगिंग बेल्स' या कंपनीनंतर आता 'चॅम्पवन' या कंपनीनं सर्वात स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचा दावा केलाय.
चॅम्पवन या कंपनीचं कार्यालय राजस्थानच्या जोधपूर शहरात असल्याचं सांगण्यात येतंय.
या कंपनीनं 'चॅम्प इंडिया सी वन' नावाचा स्मार्टफोन जाहीर केलाय. उल्लेखनीय म्हणजे, हा स्मार्टफोन केवळ ५०१ रुपयांत उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनसाठी बुकिंग २ सप्टेंबरपासून सुरू झालीय. 'कॅश ऑन डिलिव्हरी'मध्ये ग्राहकांना फोन हातात पडल्यानंतर पैसे चुकते करावे लागतील.
परंतु, ग्राहकांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या वेबसाईटवर सध्या काही तांत्रिक कारणामुळे रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही.
'चॅम्प इंडिया सी वन'ची वैशिष्ट्यं...
'चॅम्प इंडिया सी वन' हा एक ड्युएल सिम स्मार्टफोन आहे. अॅन्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर तो चालतो. यामध्ये ५ इंचाचा एक एचडी (७२० X १२८० पिक्सल) आयपीएस डिस्प्ले, १.३ गीगाहर्टझ क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी ६७३५ प्रोसेसर आणि २ जीबी रॅम उपलब्ध आहे.
इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी आहे. रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल आहे. तर या स्मार्टफोनमध्ये २५०० एमएएचची बॅटरी उपलब्ध आहे. हा फोन फोर जी नेटवर्कला सपोर्ट करतो. सफोट, सिल्व्हर आणि गोल्डन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.