विद्यार्थ्यांना आता कॉलेजमध्येच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स
राज्यात सर्व महाविद्यालयात विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. १६ तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबई : राज्यात सर्व महाविद्यालयात विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली आहे. १६ तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबईच्या किर्ती महाविद्यालयापासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना यापुढे आरटीओ कार्यालयात यायची आवश्यकता राहणार नाही आहे.