मुंबई : WhatsAppनं याच आठवड्यामध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केली होती, पण फक्त तीनच दिवसांमध्ये स्पॅमर्सनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून यूजर्सना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी स्पॅम वेबसाईटही तयार करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु झाल्यानंतर लगेचच यूजर्सना इनव्हिटेशन यायला सुरुवात झाली होती. या लिंकवर क्लिक केल्यानंतर यूजर नव्या पेजवर जातो आणि व्हिडिओ कॉलिंगचं फिचर ऍक्टिव्ह करता येत आहे. 


याचाच फायदा घेऊन स्पॅमर्सनी नवी वेबसाईट बनवून अशाच प्रकारचं इनव्हिटेशन या वेबसाईटवरून येत आहे. त्यामुळे अशा वेबसाईटपासून सावध राहणं गरजेचं आहे.