नवी दिल्ली :  लाल आणि सफेद रंगाच्या रोषणाईने सजलेला हा फोटो आहे अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरातील.हा फोटो दिसण्यास जरी सुंदर वाटत असला तरी या फोटोबद्दलचे सत्य जाणून तुम्ही हैराण व्हाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा रोषणाईचा फोटो म्हणजे रस्त्यावरील ट्रॅफिक जॅम आहे. आता तुम्ही म्हणाला हा फोटो इतका भव्यदिव्य कसा. अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी थँक्सगिव्हिंग डे साजरा केला जातो. या दिवशी देवाचे आभार मानले जातात. 


विशेष म्हणजे या दिवसानंतर अमेरिकेत सुट्ट्यांचा सीझन सुरु होतो. यंदा 24 नोव्हेंबरला 405 मोटरवेवर लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे येथील ट्रॅफिक जॅम झाली.