मुंबई : प्रेमात पडल्यावर आपल्या पार्टनरकडून ते तीन शब्द ऐकायला तुमचे कान आतुर असतात. हे तीन शब्द पार्टनरचे तुमच्यावरचे प्रेम दाखवते. मात्र तुम्हाला माहीत आहे का या तीन शब्दांव्यतिरिक्त 6 अशा गोष्टी आहेत ज्या पार्टनरसाठी अधिक महत्त्वाच्या असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी तुझ्यासोबत आहे - पार्टनरचा हा शब्द समोरच्या व्यक्तीला मोठा दिलासा देणारा ठरतो. 


सगळ ठीक होईल - जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा सर्वच असे म्हणतात. मात्र तुमच्या ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास आहे अशा माणसाने हे म्हटल्यास पार्टनरला दिलासा मिळतो. 


मला माफ कर - माफी मागण्यात कधीही गैर नसते. अनेकदा माफी मागल्याने तुटण्याच्या मार्गावर आलेली नाती पुन्हा जोडली जातात. 


शांत हो मी करेन - काही कामे अशी असतात जी तुम्ही काही कारणांमुळे करु शकत नाहीत. यामुळे सतत चिडचिड करता. अशात जर तुमच्या पार्टनरने शांत हो मी करेन ते काम असे म्हटल्यास तुमच्यावर मोठे ओझे कमी होते. 


पोहोचल्यावर कॉल अथवा मेसेज कर - या वाक्यावरुन तुमच्या पार्टनरला तुमची काळजी दिसून येते. 


तु खूप छान आहेस - फक्त आयलव्ह यू असं बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीची स्तुती करा. ती व्यक्ती तुम्हाला का आवडते हे सांगा. भावना व्यक्त करा.