मुंबई : स्मार्टफोनचा एक जीबी, दोन जीबी रॅम आता खूप मागे पडतोय... बाजारात आता तब्बल १२ जीबी रॅमसहीत एक सुपरफोन येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ट्युरिंग रोबोटिक इंडस्ट्रीज' हा नवीन सुपरफोन बाजारात आणणार आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडेच राहतील.


फ्युचर फोन


१२ जीबी रॅम, ६० मेगापिक्सल कॅमेरा आणि तीन बॅटरीसहीत हा स्मार्टफोन तुम्हाला मिळणार आहे. 'कॅडेन्झा' असं या स्मार्टफोनचं नाव असलं तरी 'फ्युचर फोन'च्या नावानही हा फोन ओळखला जातोय.


मजबूत आणि वॉटरप्रूफही


हा फोन आयफेल टॉवरवरून खाली फेकला गेला तरी तो तुटणार नाही असा कंपनीचा दावा आहे. 'लिक्विडमोर्फियम' नावाच्या धातूपासून हा बनवण्यात आलाय. हा धातू अॅल्युमिनिअम आणि स्टीलपेक्षा जास्त मजबूत असतो. तसंच हा फोन वॉटरप्रूफही असेल.


जबरदस्त मेमरी


या स्मार्टफोनमध्ये तब्बल ५१२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आलीय. इतकच नाही तर २५६ जीबीचे दोन मायक्रो एसडी कार्ड टाकून ही मेमरी ५१२ जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते.


'फ्युचर फोन'ची इतर वैशिष्ट्यं म्हणजे, १६ क्रायो कोरचे दोन स्नॅपड्रॅगन ८३० प्रोसेसर आणि १२ जीबी रॅम यात असेल. २ जीबीच्या वेगवेगळ्या सहा स्लॉटमध्ये हा रॅम उपलब्ध असेल.