खोडकर माकड आणि चिमुरड्याचा मजेशीर व्हिडिओ
इंटरनेटवर एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होताना दिसतोय. यूट्यूबवर हा व्हिडिओ टॉप ट्रेन्डिंग लिस्टमध्ये सर्वात वर दिसतोय.
नवी दिल्ली : इंटरनेटवर एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होताना दिसतोय. यूट्यूबवर हा व्हिडिओ टॉप ट्रेन्डिंग लिस्टमध्ये सर्वात वर दिसतोय.
या मजेशीर व्हिडिओमध्ये एक छोटं माकड एका चिमुरड्यासोबत खोडकर पद्धतीनं खेळताना दिसतंय. तो वारंवार चिमुरड्याच्या जवळ येतो आणि त्याला स्पर्श करायला बघतोय. परंतु, चिमुरडा मात्र माकडाला भलताच भीतोय... आणि रडताना दिसतोय.
माकडाला घाबरून चिमुरडा पळण्याचाही प्रयत्न करतोय... आणि बिचारं माकड मात्र या चिमुरड्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करतोय.
3 जानेवारी रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. केवळ दोन आठवड्यांत हा व्हिडिओ यूट्यूबवर जवळपास 12 लाख लोकांनी पाहिलाय.